च्यायला ! या कोरोनाने जीण मुश्किल करून टाकलंय राव. एक काळ होता जेव्हा सगळे जण एकत्र भेटून फिरायला जायचे, भेटायचे, दंगा- मस्ती करायचे आणि आता माणूस समोर आला की धडकीच भरते. पहिला विचार मनात हा येतो की याला कोरोना तर नसेल ना 😥. आपली प्रिय माणसं सुद्धा भेटली ना तरीही आनंद व्हायच्या आधी टेंशन पहिल येत. पूर्वी लोकांना एकांत हवा असायचा आणि आता तोच नकोसा झालाय. माणसांमधलं संभाषणच संपलयं. मित्रांना फोन केला तर पूर्वी लाख किस्से ऐकायला मिळायचे, चार नवीन शिव्या ऐकू यायच्या, नवीन किस्से रचले जायचे, विनोद व्हायचे आणि आता या सगळ्याची जागा शांततेने घेतली आहे. आता मित्रांशी फोनवर बोलताना silence जास्त आणि किस्से कमी असतात. माणसांना जगण्यासाठी माणसांच्या असण्याची गरज किती असते ही याच कोरोनाने दाखवलं. यात सगळच काही वाईट झालं असं म्हणणार नाही मी, पण कुठेतरी हे आता थांबायला हवं हीच इच्छा. हे 'new normal' च फेड आलंय ना ते नकोस झालंय. हल्ली पोटात बा...
I love to write, read and experience. this blog is just like a journal that we write every night. i love to write and hence i am sharing my thoughts with you all. hope you like it.