Skip to main content

नको हा कोरोना

          च्यायला ! या कोरोनाने जीण मुश्किल करून टाकलंय राव. एक काळ होता जेव्हा सगळे जण एकत्र भेटून फिरायला जायचे, भेटायचे, दंगा- मस्ती करायचे आणि आता माणूस समोर आला की धडकीच भरते. पहिला विचार मनात हा येतो की याला कोरोना तर नसेल ना 😥. आपली प्रिय माणसं सुद्धा भेटली ना तरीही आनंद व्हायच्या आधी टेंशन पहिल येत. 

             पूर्वी लोकांना एकांत हवा असायचा आणि आता तोच नकोसा झालाय. माणसांमधलं संभाषणच संपलयं. मित्रांना फोन केला तर पूर्वी लाख किस्से ऐकायला मिळायचे, चार नवीन शिव्या ऐकू यायच्या, नवीन किस्से रचले जायचे, विनोद व्हायचे आणि आता या सगळ्याची जागा शांततेने घेतली आहे. आता मित्रांशी फोनवर बोलताना silence  जास्त आणि किस्से कमी असतात. माणसांना जगण्यासाठी माणसांच्या असण्याची गरज किती असते ही याच कोरोनाने दाखवलं. 

             यात सगळच काही वाईट झालं असं म्हणणार नाही मी, पण कुठेतरी हे आता थांबायला हवं हीच इच्छा. हे   'new normal' च फेड आलंय ना ते नकोस झालंय. हल्ली पोटात बाहेरचं चविष्ट जाण्या ऐवजी काढे आणि गोळ्याच जास्त गेल्यात. त्या पोटाला पण प्रश्न पडला असेल आता की ही बेन इतकं सुधारलं कसं  काय म्हणून 😅. पण त्याला तरी काय सांगणार, सुधारलेलो तर आम्ही नाहीच फक्त जरा भीतीच जास्त वाटते सध्या. उगाच नाही तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला. 

              हे वर्ष कसं गेलं ते कळलंच नाही मुळी. पूर्वी मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत फिरायला जायच्या तारखा ठरवायचो आणि आता शेवटी कधी भेटलेलो याच्या तारखा आठवतोय. जीवनातला रसच गायब झालाय असं वाटतं. कुठे दंगा- मस्ती नाही, पार्ट्या नाहीत, मिरवणुकी नाहीत गेला बाजार भाषणं पण चालली असती, पण ते पण नाही, सगळं पुन्हा  सुरळीत व्हावं एवढंच वाटतंय  आता. 

               या कोरोना काळात अनेक नाती जमली, काही नाती अतूट बनली तर काही कायमची तुटली. समुद्र मंथनातून कसं पहिलं विष बाहेर सरलं होतं, तसंच सध्या विषाणू बाहेर सरलेत बहुतेक. कदाचित अमृतासारखं पुढे काहीतरी छान वाढून ठेवलं असेल. आपण सध्या तरी सगळं छान होणार हीच अपेक्षा मनात बाळगू शकतो. कारण काय आहे ना, आपण फक्त ठरवू शकतो किंवा विचार करू शकतो, पण खऱ्या आयुष्यात जे होतं ते आपल्या हातात नसतं हे या काळात नीट कळाल. त्यामुळे या सध्याच्या परिस्थितीत आपण 'new normal' ला काही काळापुरतं आपलसं करू आणि स्वत:साठी काहीतरी 'new ' पण 'normal ' घडवत राहू जेणेकरून आनंदात तरी राहता येईल. काय म्हणता चालेल ना ?😃 


लेखक - अदिती हितेंद्र भट 

Comments

  1. मस्त लिहिलंय. खरंच असं वाटतं की हे सगळ लवकर संपू दे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! संपेल लवकरच संपेल.

      Delete
  2. You are great at conveying things and have written exactly what's happening around and how one feels at this time of the pandemic situation. Keep going would like to read more from you 🥰😃

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

'JANE THE VIRGIN'

  An American romantic comedy- drama which is available on Netflix. I started watching this randomly and started getting hooked to the story and watched episodes after episodes and managed to finish all the seasons within a month. I'll first talk about the things i loved about this show. 1. The actors have played an amazing role and as a viewer i could totally get attached to the role and could feel what they felt. Their acting was on point. 2. The story is really new to me and i started loving it from the beginning only. 3. The way they have shown the relationship and the drama that we see in relations is good. 4. The direction was amazing. Every scene is performed so well and it eventually adds up to the show. Now let's talk about the things i disliked about this show. ( They are more than the liked ones😌) 1. As much i have loved the acting and actors, i still feel that some of the characters were not added to the story and could have kept it a nice, short and sweet. 2. I fe...

Based on Jenny Han’s books.

  Have you ever written a letter to someone? A love letter may be? If you have, can you imagine if all those letters just got delivered to the person to whom you had written it? Kind of bummed about it right? Something like this happens to Lara Jean in this movie. To all the boys I have loved before, To all the boys: - P.S. I still love you and To all the boys: - always and forever , these are the three parts of the movie and it’s based on books written by Jenny Han. The story revolves around the life of Lara Jean and all the people related to her. Lana Condor plays the role of Lara Jean in the movie.   The movie is a light hearted romance of high school students which starts in the 1 st part and ends in the 3 rd . Personally, if you ask me, I loved the movie and the story plot. It keeps your mind and heart in a happy place. Though it’s a love story, it’s not boring. It keeps you tied till the end and also makes you want to watch the other parts. I finished all the th...