इतरांना सांभाळण्यात, त्यांच्या बरोबर वेळ घालवण्यात आपण इतके गुंग होतो की स्वतःसाठी वेळ काढायला आपल्याला वेळच मिळत नाही. सतत दुसऱ्यांवर प्रेम करण्याच्या नादात स्वतःच्याही प्रेमात पडणं त्याहून अधिक महत्वाचं असतं हे आपण सपशेल विसरलोय. मी परवाच कुठेतरी ऐकलं की स्वतःबरोबर राहण्यात माणूस घाबरतो कारण आपण स्वतः कसे आहोत याची जाणीव सतत होत राहते. इतरांबरोबर असताना आपण स्वतःची त्यांच्यासमोर एक image तयार केलेली असते परंतु एकटं असताना आपण स्वतःलाच स्वतःबद्दल खोटं सांगू शकत नाही. त्यामुळेच अनेकदा होतं तेवढं याच 'स्वतः' पासून लांब पळण्यासाठी आपण इतरांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो. सतत कोण तरी आपल्याला हवा असतो आणि इथेच आपलं चुकतं. बाहेर किती गोंधळ आहे तो बघण्याच्या धुंदीत स्वतःच्या डोक्यातील विचार, मनातील भावना केवढा गोंधळ घालत असतात हे पाहायचं अनेकदा आपण जाणूनबुजून टाळतो. पण आपल्याला हेच कळत नाही की एकवेळ बाहेरचा गोंधळ थांबेल पण आतील गोंधळ हा त्याचा बंदोबस्त न केल्याने केवळ वाढतच जाईल, आणि हे जेव्हा मला समजलं ना तेव्हा मी ठरवलं की बाहेरील माणसांना खूश करत राहण्यापेक्षा हा गोंधळ शांत करणं...
I love to write, read and experience. this blog is just like a journal that we write every night. i love to write and hence i am sharing my thoughts with you all. hope you like it.