Skip to main content

एकांत

 इतरांना सांभाळण्यात, त्यांच्या बरोबर वेळ घालवण्यात आपण इतके गुंग होतो की स्वतःसाठी वेळ काढायला आपल्याला वेळच मिळत नाही. सतत दुसऱ्यांवर प्रेम करण्याच्या नादात स्वतःच्याही प्रेमात पडणं त्याहून अधिक महत्वाचं असतं हे आपण सपशेल विसरलोय. मी परवाच कुठेतरी ऐकलं की स्वतःबरोबर राहण्यात माणूस घाबरतो कारण आपण स्वतः कसे आहोत याची जाणीव सतत होत राहते. इतरांबरोबर असताना आपण स्वतःची त्यांच्यासमोर एक image तयार केलेली असते परंतु एकटं असताना आपण स्वतःलाच स्वतःबद्दल खोटं सांगू शकत


नाही. त्यामुळेच अनेकदा होतं तेवढं याच 'स्वतः' पासून लांब पळण्यासाठी आपण इतरांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवतो. 

सतत कोण तरी आपल्याला हवा असतो आणि इथेच आपलं चुकतं. बाहेर किती गोंधळ आहे तो बघण्याच्या धुंदीत स्वतःच्या डोक्यातील विचार, मनातील भावना केवढा गोंधळ घालत असतात हे पाहायचं अनेकदा आपण जाणूनबुजून टाळतो. पण आपल्याला हेच कळत नाही की एकवेळ बाहेरचा गोंधळ थांबेल पण आतील गोंधळ हा त्याचा बंदोबस्त न केल्याने केवळ वाढतच जाईल, आणि हे जेव्हा मला समजलं ना तेव्हा मी ठरवलं की बाहेरील माणसांना खूश करत राहण्यापेक्षा हा गोंधळ शांत करणं जास्त गरजेचं आहे. स्वतःबरोबर एकांतात वेळ घालवला, स्वतःला जे सगळ्यात जास्त आवडतं त्यात रमून गेलो की आपणच आपल्याला जास्त आवडू लागतो. हळू-हळू विचरांचा गुंता सुटत जातो. लोकांनी लावलेले बोल, 'जुने जाउद्या मरणालागी' या प्रमाणे नाहीसे होत जातात आणि हा हलकल्लोळ थांबून आपण कधी शांत होतो हे समजतच नाही. 

इतरांनी आपल्याला वेळ द्यावा, प्रेम करावं, समजून घ्यावं हे असं जेव्हा वाटतं ना तेव्हा एक प्रश्न उद्भवतो आणि तो म्हणजे, "तू स्वतः साठी हे करू शकत नाहीस तर दुसऱ्यांकडून का अपेक्षा ठेवतेस ?". आपण  स्वतःवर ज्या  दिवशी प्रेम करू शकू  त्यानंतरच लोक आपल्यावर प्रेम करू शकतात, कारण जर तुमच्याच नजरेत तुम्ही स्वतःचा तिरस्कार करत असाल तर लोक तरी कसे प्रेम करतील? 

जी व्यक्ति आपण मरेपर्यंत साथ देते ती  म्हणजे स्वतः आम्हीच. पण याच व्यक्तीसाठी वेळ काढायचा झाला की आपण busy असतो. त्यामुळेच स्वतःला स्वतःसाठी free ठेवणं जास्त महत्वाचं आहे आणि हे ज्याला जमलं त्याला सगळंच जमलं असं म्हणता येतं. 

त्यामुळे मला एवढंच म्हणायचय  की स्वतः साठी आधी वेळ द्या. स्वतःला स्वतःच्या नजरेत प्रेम दिसू द्या. जर आपणच आपला आदर करत नाही तर लोक तरी काय करतील ? 

त्यामुळेच स्वतःला  priority बनवा आणि मग दुसऱ्यांसाठी वेळ काढा. कारण स्वतःला विसरून दूसरा मिळत नाही. गरज संपली की प्रत्येक हात सुटत जातो आणि नवीन हात त्याच पद्धतीने जोडले जातात आणि सोडले पण  जातात. त्यामुळे इतरांचा हात घट्ट धरून स्वतःलाच इजा करण्यापेक्षा आधी स्वतःचा हात घट्ट धरा आणि स्वतःवर प्रेम करा. 

Comments

  1. Beautiful aditi
    And absolutely true.

    ReplyDelete
  2. विचार आणि मन जितकं सोज्वळ असावं तेवढं कमीच..उत्तम विचार आहेत, अदिती... मनातुन लेखणी पर्यंतचा प्रवास छान रितीने व्यक्त केलेला दिसून येतोय.खूप अश्या वेळीं आपण स्वतः हुन दूर जातो कारण एक म्हणजे आपण स्वतः बदल पाहण्याच्या तयारीत नसतो आणि दुसरं म्हणजे आपण तेच लपवण्या करीता pretentious बनून राहतो जसं ह्या लेखामध्ये आपण व्यक्त केलं.
    So keep writing...keep up this thinking and let the ink flow with the colors of thoughts and character in your writing...again wonderful! Need this thinking and understanding self worth.

    ReplyDelete
  3. Wowwww😍😍😍
    Khuup chhaan lihilays ga❤️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

'JANE THE VIRGIN'

  An American romantic comedy- drama which is available on Netflix. I started watching this randomly and started getting hooked to the story and watched episodes after episodes and managed to finish all the seasons within a month. I'll first talk about the things i loved about this show. 1. The actors have played an amazing role and as a viewer i could totally get attached to the role and could feel what they felt. Their acting was on point. 2. The story is really new to me and i started loving it from the beginning only. 3. The way they have shown the relationship and the drama that we see in relations is good. 4. The direction was amazing. Every scene is performed so well and it eventually adds up to the show. Now let's talk about the things i disliked about this show. ( They are more than the liked ones😌) 1. As much i have loved the acting and actors, i still feel that some of the characters were not added to the story and could have kept it a nice, short and sweet. 2. I fe...

Based on Jenny Han’s books.

  Have you ever written a letter to someone? A love letter may be? If you have, can you imagine if all those letters just got delivered to the person to whom you had written it? Kind of bummed about it right? Something like this happens to Lara Jean in this movie. To all the boys I have loved before, To all the boys: - P.S. I still love you and To all the boys: - always and forever , these are the three parts of the movie and it’s based on books written by Jenny Han. The story revolves around the life of Lara Jean and all the people related to her. Lana Condor plays the role of Lara Jean in the movie.   The movie is a light hearted romance of high school students which starts in the 1 st part and ends in the 3 rd . Personally, if you ask me, I loved the movie and the story plot. It keeps your mind and heart in a happy place. Though it’s a love story, it’s not boring. It keeps you tied till the end and also makes you want to watch the other parts. I finished all the th...

नको हा कोरोना

          च्यायला ! या कोरोनाने जीण मुश्किल करून टाकलंय राव. एक काळ होता जेव्हा सगळे जण एकत्र भेटून फिरायला जायचे, भेटायचे, दंगा- मस्ती करायचे आणि आता माणूस समोर आला की धडकीच भरते. पहिला विचार मनात हा येतो की याला कोरोना तर नसेल ना 😥. आपली प्रिय माणसं सुद्धा भेटली ना तरीही आनंद व्हायच्या आधी टेंशन पहिल येत.               पूर्वी लोकांना एकांत हवा असायचा आणि आता तोच नकोसा झालाय. माणसांमधलं संभाषणच संपलयं. मित्रांना फोन केला तर पूर्वी लाख किस्से ऐकायला मिळायचे, चार नवीन शिव्या ऐकू यायच्या, नवीन किस्से रचले जायचे, विनोद व्हायचे आणि आता या सगळ्याची जागा शांततेने घेतली आहे. आता मित्रांशी फोनवर बोलताना silence  जास्त आणि किस्से कमी असतात. माणसांना जगण्यासाठी माणसांच्या असण्याची गरज किती असते ही याच कोरोनाने दाखवलं.               यात सगळच काही वाईट झालं असं म्हणणार नाही मी, पण कुठेतरी हे आता थांबायला हवं हीच इच्छा. हे   'new normal' च फेड आलंय ना ते नकोस झालंय. हल्ली पोटात बा...